खेळ गं खेळ भातुकलीचा, फक्त एकदाच...
जे कधी घडलंही नाही ते अनुभवू फक्त एकदाच !
भांडत होतीस जेव्हा लुटूपुटूचं
कळत होतं नं गुपित प्रेम लपवण्याचं ?
का नाही गं मिटलं भांडण तेव्हा कट्टी-बट्टीचं ...
समोर असताना नाही सुटलं मौन प्रीतीचं
दूर जात होतो तुझ्यापासून, की माझाच मला हरवत होतो?
जगून दाखवीन तुझ्याशिवाय असं मलाच भासवत होतो!
बसवलंय जग तुझ्याशिवायही आता
आणि तूही गुरफटलीयेस त्याच्या विश्वात
जिथे कसले आभास नाहीत की लुटुपुटुची भांडणही नाहीत
फक्त आहे संवाद मनांचा, ध्यास तुझ्या श्वासांचा
सांग ना ग आज एकदाच की, तू माझी आहेस फक्त माझी.,
ह्या नाही तर पुढच्या जन्मी तरी फक्त माझी
नाही मोडवत साथ सात जन्मांची?
वाट बघीन मी आठव्या जन्माची...