मन उकलून बसली
माणूसपणाची आस
बिरुदांना नाकारत गेली
तो एक क्षण मोहाचा
आश्वासक स्पर्शाचा
अन् मन रिती करती झाली
समई होऊनी तेवता तेवता
ज्योतीचीच ठिणगी झाली
पिल्लांच्या कुशीत जाताना
आईपण हरवून बैसली
तो एक क्षण मोहाचा
आश्वासक स्पर्शाचा
अन् कात टाकून स्वत:स नवीन उमगली...
No comments:
Post a Comment